Varsha Gaikwad News
Varsha Gaikwad NewsSakal

मराठी शाळांमध्ये पहिलीपासूनच मिळणार इंग्रजीचे धडे : वर्षा गायकवाड

इंग्रजी शब्दांचा वापरामुळे विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होणार आहेत.
Published on

मुंबई : शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम (Marathi Medium School) शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad ) यांनी विधानसभेत दिली आहे. या बदलानुसार पहिलीपासूनच मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा (English Word) वापर करण्यात येणार असून, मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापरामुळे विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. त्यासोबतच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी विधीमंडळात केली आहे.

Varsha Gaikwad News
... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

विधानसभेत शिक्षण विभागाशी संबंधित उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वरील महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, बालभारतीला उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणण्याची सूचना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली असून, या पुस्तकांमध्ये मराठी शब्द आणि वाक्यांसह इंग्रजी मजकूरदेखील असणार आहे. यासोबतच मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश (Educational Material ) आणि लेखन साहित्य पुरवले जाते यामध्येदेखील बदल करण्यात आला असून, हे साहित्या आता सरसकट पहिली ते आठवीच्या विद्याथ्यांना पुरवण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com