
viral news 21 years old groom 52 years old bride now: प्रेमाला वय नसतं, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं....एवढेच नाही तर प्रेम केलं कुणाला घाबरायचंही नसतं....हे सारं आपण कित्येकदा ऐकत आलो आहे. त्यावर रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीही ऐकत, वाचत आलो आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा तितकाच आनंदाचा क्षण असतो. तो आणखी संस्मरणीय करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया लढवत तो सोहळा स्पेशल करण्याचा प्रयत्न करतात. एका पठ्ठयानं मात्र आपलं लग्न अशा व्यक्तीसोबत केलं आहे की त्यांच्या वयाची चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे ते दोघेही सोशल मीडियावर लाईमलाईटमध्ये आल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काही लग्नं अशी असतात की काही केल्या त्याचा तुम्हाला विसर पडत नाही. त्या लग्नातील ती गोष्ट स्पेशल असते. बऱ्याचदा लोकंही विचारात पडतात की, हे सगळं कसं काय होऊ शकते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ यातून त्याची साक्ष पटल्याशिवाय राहत नाही. लग्नाला वयाचं बंधन राहिलेलं नाही की काय असा प्रश्न त्या घटनेवरुन दिसून येते आहे. त्या पोस्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरदेव हा २१ वर्षांचा आहे तर त्याची बायको ही तब्बल ५२ वर्षांची आहे.
सोशल मीडियावरील त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटही भलत्याच भन्नाट आहे. परी आहे माझी म्हणत त्यानं त्या महिलेशी विवाह केला. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होतो. शेवटी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. एकानं लिहिलं आहे की, अरे आईच्या वयाची आहे ती, तिच्याशी कसं काय लग्न करु शकतोस...दुसऱ्यानं लिहिलं आहे की, एखादा पुरुष तिच्या मुलीबरोबरच्या एखादीशी लग्न करु शकतो तर एखादी बाई नाही का करु शकत तिच्या मुलाच्या वयाच्या एखाद्याशी लग्न....त्या पोस्टनं नेटकरी हैराण झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.