Mon, Jan 30, 2023

Fire Viral Video : चड्डी जळाली तरी पठ्ठ्या हवेतंच; आगीशी स्टंट करणं पडलं महागात
Published on : 15 December 2022, 5:24 am
Fire Viral Video : काही लोकांना स्टंट करण्याचे जबरदस्त किडे असतात. अगदी जीवाची बाजी लावून, जीव धोक्यात घालून स्टंट करतात. यात तरूणांपासून वृध्दांचाही सहभाग असतो. पण बऱ्याचदा स्टंट करण फार महागात पडतं. बऱ्याचदा आपल्या सवयीच्या गोष्टीपण कशा फसतात, याचं उदाहरण असणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकतात की, एक माणूस आगीचा खेळ करत असतो. आग लावलेली काठी वर फेकून पँट खालून बाहेर काढतो. पण त्याचा हा स्टंटच त्याला महागात पडला. एकदा तर ती काठी व्यवस्थित बाहेर पडली, पण दुसऱ्यांदा किडे कर स्वतःच पँटमध्ये धरून ठेवली आणि आग कशी लागत नाही दाखवताना पँटने पेट घेतला.
आगीशी खेळ करू नका असा सल्ला कायम दिला जातो. तो ऐकला नाही की, असं होतं अशी कमेंट काही नेटकऱ्यांनी केली आहे.