जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

जेएनयूच्या गर्ल्स हॉस्टेलवर सापडलेल्या वस्तू म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेक्स टॉइज, कंडोम्स असं सामान या फोटोंमध्ये दिसत आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो खरंच जेएनयू गर्ल्स हॉस्टेलमधील आहेत का? व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे पाहिल्यास लक्षात येईल की हे फोटो फेक आहेत.
 

नवी दिल्ली : जेएनयूच्या गर्ल्स हॉस्टेलवर सापडलेल्या वस्तू म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेक्स टॉइज, कंडोम्स असं सामान या फोटोंमध्ये दिसत आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो खरंच जेएनयू गर्ल्स हॉस्टेलमधील आहेत का? व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे पाहिल्यास लक्षात येईल की हे फोटो फेक आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूच्या कुठल्याही होस्टेलमध्ये जमिनीवर असं कार्पेट नाही. शिवाय रूम हिटरही फोटोत दिसतो आहे. त्यावरूनही हा फोटो हॉस्टेलवरचा नाही, हे सहज लक्षात येते. रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आणि हे फोटो आले कुठून याचा शोध घेतल्यानंतर हे फोटो जुने असल्याचं सिद्ध झाले आहे. पहिला फोटो ऑगस्ट 2015 मधला आहे. Redditवर एका यूजरने तो पोस्ट केला आहे. 

तत्पूर्वी, जेएनयूमध्ये गेल्या आठवड्यात तोंडावर रुमाल बांधून आलेल्या कथित गुंडांनी जोरदार मारहाण केली. जेएनयूधल्या या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जेएनयूमधल्या या 5 जानेवारीच्या हिंसाचारात अनेक विद्यार्थ्यांना लाठ्या, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तोंड झाकलेल्या हल्लेखोरांचे फोटोही व्हायरल झाले, पण या घटनेत अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Photos of Sex Toys and Condoms at JNU Hostel are Fake. What if They Weren't?

Tags
टॉपिकस
Topic Tags: