आईच 'ती'! पोटाची खळगी भरण्यासाठी बाळाला सोबत घेऊन चालवतेय Uber Car; नेटकरी म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


viral story news in Marathi

आईच 'ती'! पोटाची खळगी भरण्यासाठी बाळाला सोबत घेऊन चालवतेय Uber Car; नेटकरी म्हणतात...

Inspiring Story Viral: आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आई-वडील काहीही करण्यास तयार असतात. त्यातच उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि कुटुंब चालवण्याच्या जबाबदारी असेल तर आईला आपल्या लेकराला सोबत घेऊन कामाला जावं लागतं. असाच एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोचं नेटकरी तोंडभरून कौतुक करत आहेत.

हेही वाचा: Sambhaji Bhide Controversy: ...तर मी कुंकू लावणार नाही; संभाजी भिडे प्रकरणावर शालिनी ठाकरे स्पष्टच बोलल्या

फोटोमधील महिला उबेर कॅबची ड्रायव्हर असून ती तिच्या लहान मुलीला सोबत घेऊन कॅब ड्रायव्हिंगचे काम करते. हो फोटो CloudSEK चे CEO राहुल सासी यांनी LinkedIn या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, जेव्हा त्यांनी कॅब बुक केली तेव्हा त्यांना माहित नव्हतं की एक आई त्यांनी बुक केलेल्या कारची ड्रायव्हर आहे.

हेही वाचा राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

राहुल ससी यांनी पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, त्यांनी बंगळुरूमध्ये उबेर कॅब बुक केली होती, परंतु त्यांना कोण घ्यायला येणार याची कल्पना नव्हती. राहुल सांगतात की, जेव्हा कॅब आली आणि समोर थांबली, तेव्हा त्यात एक महिला ड्रायव्हर होती, तिच्या शेजारच्या सीटवर एक सुंदर मुलगी झोपलेली पाहून मला आश्चर्य वाटले.

हेही वाचा: शिंदे गटात परतीचे वारे? स्वगृही परतण्यास इच्छूक 'त्या' आमदाराचं नाव ठाकरे गटाकडून उघड

प्रवासादरम्यान राहुल ससीला महिलेकडून तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते, त्यानंतर संभाषणात महिलेने तिचे नाव नंदिनी असून तिला उद्योजक बनायचे असल्याचे सांगितले. याआधी नंदिनीने काही वर्षांपूर्वी फूड ट्रकही सुरू केला होता, पण कोरोनाने सर्व काही उद्ध्वस्त केले. व्यवसायही चालू शकला नाही आणि सर्व भांडवल खर्च झाले. मात्र खचून न जाता, नंदिनीने पुन्हा उभं राहण्यासाठी कॅब चालवण्यास सुरुवात केली.

नंदिनीने संवादादरम्यान सांगितले की, ती 12 तास ड्राईव्हिगचे काम करते. नंदिनीच्या मते कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. नंदिनी पुन्हा तिच्या स्वप्नांना बळ देण्याचे प्रयत्न करत आहे. प्रवासी राहुल ससी नंदिनीच्या बोलण्याने इतके प्रेरित झाले की, त्यांनी तिच्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल ससी यांनी सोशल मीडियावर फोटोसह एक पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे पोस्टनंतर उबेरचे कंट्री हेड प्रभजीत सिंग यांनीही या महिलेला मदत करण्यासाठी संपर्क साधला.