Video: लज्जास्पद! स्कूटी साफ करण्यासाठी चक्क तिरंग्याचा वापर; पोलीसांकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video: लज्जास्पद! स्कूटी साफ करण्यासाठी चक्क तिरंग्याचा वापर; पोलीसांकडून दखल

Viral Video: तिरंगा देशाच्या अस्मितेचं प्रतिक असून त्याला शिस्तीत जपणे हे प्रत्येक भारतीयाचं खरं तर कर्तव्य आहे. कर्तव्यापलीकडे जाऊन एका व्यक्तीची वागणुक लज्जास्पद ठरतेय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क त्याच्या स्कुटीवरचा धूळ साफ करण्यासाठी तिरंग्याचा वापर करताना दिसतोय. या व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय.

देशप्रेम तर बाजुलाच राहिलं. मात्र तिरंग्याचा अपमान हा व्यक्ती करत असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट दिसून येते. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत दिल्ली पोलीसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी त्याची स्कूटी जप्त केली असून तिरंगाही जप्त केलाय. या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियाचं वातवरणही तापलेलं दिसतेय. या व्हिडिओवर विविध प्रितिक्रियाही उमटल्या आहेत.

या व्यक्तीची वागणूक लज्जास्पद ठरते. 'हर घर तिरंगा' अभियान सुरू करण्याआधी प्रशासनाने तिरंग्याबाबतच्या जाहिर सूचना केल्या होत्या. त्याचं उल्लंघन करत या व्यक्तीने आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान केलाय. त्यामुळे त्याच्या स्कुटीसह तिरंगा जप्त करत त्याच्यावर दिल्ली पोलीसांनी कार्यवाही केली आहे.

Web Title: Viral Video A Man Used A Tricolor To Clean His Scooter This Shameful Video Viral On Social Media Arrested By Delhi Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..