अश्लिलपणे स्पर्श करून 'तो' देतो आशिर्वाद

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः एक ढोंगी बाबा महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून आशिर्वाद देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी मोठी टिका केली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला या ढोंगी बाबाच्या पाया पडत आशिर्वाद मागत असल्याचे दिसत आहे. यानंतर तो बाबा महिलांना नको त्या ठिकाणी अश्लिलपणे स्पर्श करून आशिर्वाद देत आहे. परंतु, त्यावर ना ती महिला आक्षेप घेते, ना तिथे अन्य भक्त. पण, हा बाबा महिलेसोबत अश्लिल कृत्य करत असताना उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाइलवर हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर असून, या बाबाच्या अश्लिल स्पर्शावर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, या कृत्याचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी अनेक ढोंगी महाराजांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये आसाराम बापू, राम रहीम यांच्यासह अनेक महाराज आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video of baba groping female follower