बाळाला कडेवर घेऊन चालवतो सायकलरिक्षा; Video पाहून गहिवरले नेटकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

बाळाला कडेवर घेऊन चालवतो सायकलरिक्षा; Video पाहून गहिवरले नेटकरी

भोपाळ : मध्यप्रदेशमधील एका सायकल रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन हा व्यक्ती रिक्षा चालवत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथील हा व्हिडिओ असून राजेश असं या व्यक्तीचं नाव आहे. मुलांना संभाळण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना सोबत घेऊन काम करावं लागत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

(Viral Video News)

दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलंही मन गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. कपडे न घातलेल्या अवस्थेतील लहान लेकरू एका हाताने खांद्यावर घेतलेल्या राजेशला अनेकांनी मदत करण्याचे अवाहन केले आहे. या मुलापेक्षा मोठी एक मुलगी राजेशला आहे. तिला घरी झोपवून या लहान बाळाला खांद्यावर घेऊन हा रिक्षा चालवत असल्याचं त्याने सांगितलं आहे. मुलांना संभाळण्यासाठी पैसे नाहीत, जर रिक्षा नाही चालवला तर खायला कोण देईल असम राजेश म्हणाला आहे.

हेही वाचा: Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला?

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून लोकांकडून सहानुभूतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. या एक वर्षाच्या चिमुकल्याला अनेकांना यानंतर मदतीचा हात दाखवला आहे. त्याचबरोबर अशा संघर्ष कुणाच्या वाट्याला येऊ नये अशा अर्थाच्या कमेंट्स नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

Web Title: Viral Video Cycle Rikshaw Father With His Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..