Viral Video: भावाला सलाम! जीव धोक्यात घालून वाचवले कुत्र्याचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: भावाला सलाम! जीव धोक्यात घालून वाचवले कुत्र्याचे प्राण

सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका रेल्वे स्टेशन वर एक कुत्रा रेल्वे ट्रॅकवर पडला आहे आणि ट्रेन येत असताना एका मुलाने आपला जीव धोक्यात घातला आणि रेल्वे ट्रॅकवर ऊडी मारून कुत्र्याचा जीव वाचवला आहे.

या व्हिडिओला सध्या सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत असून व्हिडिओतील कुत्र्याला जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मवरून वर काढणाऱ्या मुलाचे कौतुक केले जात आहे. कुत्र्याला वर काढल्यावर ट्रेनचा स्पीड वाढल्याचा आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्टेशनचा आहे हे अजून समोर आलं नसून सोशल मीडियावर या व्हिडिओला पसंती मिळत आहे. मुक्या प्राण्याला मदत करणाऱ्या भावाल सलाम अशा प्रतिक्रिया या व्हिडिओला दिल्या जात आहेत.

Web Title: Viral Video Guy Save Life Dog Fall Railway Track

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viral video