Viral Video: वाईन शॉपमध्ये बिअर न मिळाल्याने मद्यधुंद माकडाचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: वाईन शॉपमध्ये बिअर न मिळाल्याने मद्यधुंद माकडाचा गोंधळ

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड पूर्ण जोमाने बिअरचा कॅन पिताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला लोक आहेत याची त्याला पर्वा नाही. तो स्वतःची मजा लुटताना दिसतो.

हा व्हिडिओ रायबरेलीच्या गडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अचलगंज भागातील आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की हे माकड मद्यपी आहे, आणि जेव्हा त्याचा शौक पूर्ण होत नाही तेव्हा तो दारूच्या ठेक्यावर गोंधळ घालतो.

अनेकवेळा या माकडाने दारूच्या ठेक्यावर येणाऱ्या ग्राहकांकडून दारू हिसकावून प्यायली आहे. याबाबत अनेकवेळा वन अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही माकडाला पकडत नसल्याचे दारू दुकानदार मालकाचे म्हणणे आहे. वन अधिकारी म्हणतात की ते माकड आहे, त्याला मारून हाकलून द्या.

मात्र या माकडामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल होत असून त्याचा धंद्यावर परिणाम होत आहे. मात्र, ही बाब प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून ते माकड पकडल्याची चर्चा आहे.