Viral Video: गाडीला धक्का लागला अन् दीड मिनिटात महिलेने मारल्या 17 थप्पड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: गाडीला धक्का लागला अन् दीड मिनिटात महिलेने मारल्या 17 थप्पड

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील एका रस्त्यावरील व्हिडिओ व्हायरल होत असून रिक्षाचा धक्का लागला म्हणन एका महिलेने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सदर व्यक्ती माफी मागत असूनही महिला त्याला मारहाण करत आहे. त्यानंतर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(Noida Road Viral Video)

ही घटना उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे घडली असून महिलेने दीड मिनिटाच्या व्हिडिओत रिक्षाचालकाला १७ वेळा कानाखाली मारलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शुभंकर मिश्रा या नावाने असलेल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या लोकांकडून शेअर केला जात आहे. अशा घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण या व्हिडिओत एक महिलेने चक्क चालकाला १७ वेळा कानाखाली मारलं आहे त्यामुळे आता त्या महिलेविरोधात लोकांनी कमेंट केल्या आहेत.

Web Title: Viral Video Noida Road Rikshaw Driver 17 Times Beat 90 Seconds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :auto rikshawviral video