Viral Video | पाण्यात बुडत होता कावळा, अस्वलाने पाहताच पकडले पंख आणि... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पाण्यात बुडत होता कावळा, अस्वलाने पाहताच पकडले पंख आणि...

रोज सोशल मीडियावर (Social Media) अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतातच. त्यात व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळतात. त्यातच 'जाको रखे सैयां, कोय मार सकता नही...' हे तुम्ही ऐकले असेलच. याचे एक सुंदर उदाहरण तुम्हाला इथे दिसून येईल. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका अस्वल (Bear) आणि कावळ्याचा (Crow) आहे. ज्यामध्ये अस्वलाने कावळ्याचा जीव वाचवण्यासाठी काय केले आहे हे पाहून तुम्हालाही नवल वाटेल. अस्वलाने केलेल्या कामगिरीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करताहेत. हा व्हिडिओ बघण्यासाठी अतिशय मस्त असून लोकांना तो खूप आवडत आहे.

हेही वाचा: आजच्या काळात वेळेचे महत्व आवश्यक वाटते का?; पाहा व्हिडिओ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक कावळा पाण्यात बुडालेला आहे, तो स्वत:च्या बचावासाठी जोरजोरात पंख फडफडवत आहे. तिथेच तुम्हाला दिसेल की एक अस्वल तिथून चालताना दिसतोय. अस्वलाची नजर कावळ्यावर पडताच तो त्याच्या जवळ जातो आणि दोन्ही पाय पाण्यात टाकून कावळ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी अस्वल आपल्या तोंडाने कावळ्याचे पंख पकडून त्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो.

हा व्हिडिओ ट्विटरवर @TheFigen नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला. त्याने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीसह लिहिले - हिरो! आतापर्यंत हे ट्विट 30 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलंय. अनेकजण या व्हिडिओवर खूप कमेंट्स करताहेत. यावेळी एका युझरने लिहिले की, बेस्ट व्हिडिओ, दुसऱ्याने लिहिले, रेस्क्यू थोडा कठोर आहे, पण मस्त आहे! तर या व्हिडिओतून मानवतेचा संदेश मिळत असल्याचं दिसतयं.

Web Title: Viral Video Of A Bear Helping A Crow Drowns In Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..