Viral Video : ब्रा, बिकीनी अन् मिनीस्कर्ट घालून मुलीचा मेट्रोतून प्रवास; व्हिडीओने खळबळ

नेटिझन्सने या तरुणीची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.
Delhi Metro Girl in Bikini
Delhi Metro Girl in BikiniSakal
Updated on

दिल्ली मेट्रोमधले काही फोटो, व्हिडीओज सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बिकिनी, मिनीस्कर्ट घालून प्रवास करताना दिसत आहे. या तरुणीची तुलना नेटकऱ्यांनी उर्फी जावेद यांनी केली आहे.

इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही नेटिझन्सने तिच्या पेहरावाचं समर्थन केलं आहे. तर काही जणांनी तिच्यावर टीका केली आहे. या तरुणीनेही आपली काहीही चूक नाही, असं सांगितलं आहे.

Delhi Metro Girl in Bikini
Viral News : घोर कलीयुग..! करोडपती असूनही रहावं लागतंय गरीबीत, Social Media Post व्हायरल

कोण आहे ही तरुणी?

दिल्ली मेट्रोमध्ये बिकीनी घालून प्रवास करणाऱ्या या तरुणीचं नाव रिदम चन्ना असं आहे. तिने आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका मांडली आहे. ती म्हणाली, "मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे. मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धीसाठी या गोष्टी करत नाहीय. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? मला याची पर्वा नाही."

Delhi Metro Girl in Bikini
बजरंगीबलीच्या भक्तीत सैराट आज्जीबाई; भजनावर केला तुफान डान्स, Video Viral

उर्फी जावेदशी तुलना होण्यावरुन रिदम म्हणते, "मी उर्फी जावेदचं अनुकरण करत नाहीय. माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहित नव्हतं. माझे कुटुंबीय माझ्या अशा कपड्यांमुळे नाराज आहे. मला माझे शेजारीही धमक्या देतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याची मला पर्वा नाही."

Delhi Metro Girl in Bikini
Roshani Shinde Thane :Thackeray गटाच्या महिला कार्यकर्तीवर Shivsena महिलांकडून मारहाण । CCTV Viral

यावरुन होणाऱ्या वादानंतर दिल्ली मेट्रोने या तरुणीला सुनावलं आहे. आपल्या निवेदनात मेट्रोने म्हटलं आहे, "दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला अपेक्षा आहे की मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी सामाजिक शिष्टाचाराचं पालन करतील. इतर प्रवाशांच्या भावना दुखावतील, अशी कोणतीही कृती प्रवाशांनी करू नये. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com