
'मटण खायला गेलो अन् बॉसचा फोन आला', IPS अधिकाऱ्याचा रंजक किस्सा
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण बिहार पोलिसांचं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवृत्तीच्या भाषणात त्याने काही किस्से सांगितले आणि नेटकऱ्यांनी मजा घेतली.
प्रणतोष कुमार दास हे बिहार पोलीस दलात पोलिस महानिरीक्षक होते. त्यांच्या निवृत्तीवेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ बिहार सरकारच्या गृह विभागाच्या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. YouTube वर देखील त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक किस्स्यांचा खुलासा केलाय. (Viral Video of IPS Prantosh Kumar Das Bihar Police)
या व्हिडिओमध्ये प्रणतोष कुमार दास सांगतात की, ते घरी मटण खायला गेले होते. त्यांच्या पत्नीने हा बेत आखला होता. पण नया गाव नावाच्या ठिकाणी एका व्यक्तीला विजेचा झटका बसला, यानंतर लोकांनी रस्ता अडवला. यात पोलीस आयुक्तही अडकले. यादरम्यान एसपीचा फोन आला आणि तुम्ही कुठे आहात,? ही विचारणा झाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ठप्प झालेली वाहतूक जागेवर आणली.
Web Title: Viral Video Of Ips Prantosh Kumar Das Bihar Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..