Parents Assault Child
esakal
Parents Assault Child : सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका महिलेने लहान मुलाला थप्पड मारत शिवीगाळ केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओत मुलगा अत्यंत घाबरलेला आणि असहाय्य अवस्थेत दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन लहान मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता; मात्र महिलेने परिस्थिती शांत करण्याऐवजी ती अधिक चिघळवली आणि दुसऱ्या मुलावर थेट हल्ला केला.