Video: लहान मुलाने वाचविले आजीचे प्राण!

वृत्तसंस्था
Thursday, 1 October 2020

एका वळूने आजीवर हल्ला केल्याचे पाहून लहान मुलगा धाडसाने पळत आला आणि आजीचे प्राण वाचविले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्सने मुलाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

चंदीगड (हरियाणा): एका वळूने आजीवर हल्ला केल्याचे पाहून लहान मुलगा धाडसाने पळत आला आणि आजीचे प्राण वाचविले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्सने मुलाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Video: प्रपोज राहिलं बाजूला; तोंडावरच बसली लाथ

दादी चंद्रो तोमर यांनी ट्विटरवरून संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. हरियाणातील महेंद्रगड भागातील ही घटना आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'एक आजी गल्लीतून जात आहे. समोर उभा असलेल्या एका वळूने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आजी खाली कोसळल्या. वळूने आजीवर हल्ला केल्याचे पाहून नातू धावत आला. त्याने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, वळूने मुलावरही हल्ला केला. धाडसाने उठत आजीला घेऊन बाजूला गेला. वळूने पुन्हा दोघांना जोरात धडक दिली. पण, नातू घाबरला नाही तर आजीला वाचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत राहिला. यानंतर नागरिक धावत आले आणि दोघांची सुटका झाली.'

दरम्यान, चंद्रो तोमर जगातील वयस्कर शूटर आहेत. यांच्याबाबत बॉलिवूडमध्ये चित्रपटही आला होता. याचे नाव 'सांड़ की आंख हा असून, यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरने मुख्य भूमिकेत काम केले आहे. आजीला वळू पासून वाचविणाऱया नातूचा सन्मान मिळाला पाहिजे, असेही चंद्रा तोमर यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video to save grandmothers life he fought with a stray bull