esakal | Video: प्रपोज राहिलं बाजूला; तोंडावरच बसली लाथ
sakal

बोलून बातमी शोधा

romantic proposal while standing on the boat-suddenly kicked in the face video viral

प्रेमासाठी काय पण, असे बोलले जाते. शिवाय, रोमॅंटिक क्षण कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्या लढवतात. असाच एक क्षण कॅमेऱयात कैद झाल्यानंतर असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: प्रपोज राहिलं बाजूला; तोंडावरच बसली लाथ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : प्रेमासाठी काय पण, असे बोलले जाते. शिवाय, रोमॅंटिक क्षण कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्या लढवतात. असाच एक क्षण कॅमेऱयात कैद झाल्यानंतर असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू येत आहे. पण, तो क्षण प्रियकर आणि प्रेयसी आयुष्यभर विसरणार नाहीत.

Video: मोटार चालवत असताना साप लागला डुलायला

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रियकर हा प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी बोटीवर चढला होता. प्रियकर अत्यंत रोमँटिकपणे खिशातून अंगठी काढतो व पुढे करतो. प्रेयसी स्मितहास्य करीत हात पुढे करते. त्यात तिची बोट सुरू झाल्यामुळे तिचा तोल जातो आणि खाली पडले. खाली डोकं वर पाय अशी अवस्था होते. त्यातच तिची लाथ प्रियकराच्या तोंडावर पडते. त्यामुळे प्रपोज राहिले बाजूला आणि प्रियकराच्या तोंडावर लाथ पडली. अर्थात ही लाथ मारण्यासाठी नव्हती तर बोट पुढे गेल्यामुळे घडली. पण, दोघेही ही घटना कधी विसरू शकणार नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.