
टोल प्लाझावर हत्तीने कारवर हल्ला करून मागील काच फोडली, चालक सुखरूप.
हत्तींची या भागात नेहमी वर्दळ असल्याने रस्त्यावर धोका वाढला आहे.
स्थानिकांनी आणि वन विभागाने सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
Viral Video : देहरादून-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरील लच्छीवाला टोल प्लाझाजवळ शनिवारी सायंकाळी एका जंगली हत्तीने रस्त्यावर हाहाकार माजवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हत्तीने एका कारवर हल्ला करून तिचे मोठे नुकसान केले. सुदैवाने चालकाने तातडीने कार पळवून स्वतःचा जीव वाचवला. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीती आणि संताप पसरला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.