esakal | विरार दुर्घटना दु:खद! पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत

बोलून बातमी शोधा

pm modi

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

विरार दुर्घटना दु:खद! पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये विजय वल्लभ कोविड रुग्णालयात भीषण आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दुर्घटना दु:खद असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दुर्घनटेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास विरारमधील कोविड रुग्णालयात आग लागली. यावेळी आयसीयुत असलेल्या 17 पैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला तर 4 जणांना वाचवण्यात यश आलं. चारही रुग्ण गंभीर असून त्यांनी इतरत्र हलवण्यात आलं आहे. आय़सीयू वॉर्डमध्ये असललेल्या एसीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

हेही वाचा: विरार रुग्णालय दुर्घटना - डॉक्टरांनी सांगितले आगीचे कारण

आय़सीयूमध्ये 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. इतर रुग्णांची प्रकृती गंभीर नाही. रुग्णालयात एकूण 70 रुग्णांवर उपचार सुरु होते. सध्या 20 रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांना दहीसरच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ओडिसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.