esakal | विरार रुग्णालय दुर्घटना - डॉक्टरांनी सांगितले आगीचे कारण

बोलून बातमी शोधा

विरार रुग्णालय दुर्घटना - डॉक्टरांनी सांगितले आगीचे कारण

विरारमध्ये कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.

विरार रुग्णालय दुर्घटना - डॉक्टरांनी सांगितले आगीचे कारण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

विरार - पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकी लिक होऊन झालेल्या दुर्घनेनंतर या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात रात्री उशिरा आयसीयूतील एसीचा स्फोट झाला. यानंतर भीषण अशी आग लागली. आय़सीयूमध्ये 17 रुग्ण होते त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार रुग्ण स्वत:हून बाहेर पडू शकले. दरम्यान, रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली.

रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. विजय वल्लभ रुग्णालयातील डॉक्टर दिलीप शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा आयसीयुतल्या एसीचा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण अशी लागली. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा चौघेजण बाहेर पडू शकले. रुग्णालयात इतर रुग्णही उपचार घेत होते. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विजय वल्लभ रुग्णालय कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोनाचे 90 रुग्ण उपचार घेत होते.

हेही वाचा: नाशिकनंतर विरारमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली असून त्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा आहे.