virat kohli in mahakal temple ujjain
sakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी, १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी आणि मालिकेवर कब्जा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी विराट कोहली आणि कुलदीप यादव यांनी शनिवारी पहाटे महाकालेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.