यंदा ८२ हजार जण शिक्षणासाठी अमेरिकेत; आतापर्यंतची सर्वाधिक संख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

visa 82 thousand student are studying in America Highest number ever education

यंदा ८२ हजार जण शिक्षणासाठी अमेरिकेत; आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे प्रमाण कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. अमेरिकेत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी नवी दिल्ली येथील अमेरिकी दूतावास व मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकता येथील वाणिज्य दूतावासात मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्यांना नियोजित तारखेला महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये उपस्थित राहता यावे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मे ते ऑगस्ट या कालावधीत आलेल्या विद्यार्थी व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जात असल्याचे दूतावासाने एका निवेदनाद्वारे सांगितले.

‘‘यंदाच्या उन्हाळी हंगामात आम्ही ८२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत. मागील कोणत्याही वर्षापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हा बहुतांश भारतीय कुटुंबांसाठी उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक मागणी असलेला देश आहे, हे यावरून दिसून येते,’’ असे अमेरिकेच्या भारतातील अति वरिष्ठ राजनैतिक अधिकारी पॅट्रिशिया लॅसिना यांनी सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाल्याचा आनंद होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी शिक्षणात अडथळे आले होते. आता व्हिसा मिळाल्याने विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठांमध्ये वेळेवर पोचू शकतील भारत व अमेरिकेची आंतरराष्ट्रीय भागीदारी टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानही यातून अधोरेखित होते, असे त्या म्हणाल्या.

अमेरिकी दूतावासात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रस्थानी आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेची दारे कोरोना काळातही खुली होती. प्रत्यक्ष येऊन शिकण्यासाठी, ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी अमेरिकी सरकार व शैक्षणिक संस्थांनी २०२०मध्ये घेतली होती.

- डॉन हेफलिन, सल्लागार मंत्री, वाणिज्य दूतावास

Web Title: Visa 82 Thousand Student Are Studying In America Highest Number Ever Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..