

Trapped in Pakistani Honeytrap; Arrested in Visakhapatnam for Leaking Classified Information
Sakal
विशाखापट्टणम : पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून भारतीय नौदलाची अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या एका जवानाला सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या ‘काउंटर इंटेलिजन्स’ (CI) पथकाने कोईम्बतूर येथील नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रातून ही धडक कारवाई केली. देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची सागरी माहिती शत्रू देशाच्या हाती लागल्याचे उघडकीस आल्याने संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.