MP Vishweshwar Hegde Kageri
esakal
बंगळूर : खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी (Vishweshwar Hegde Kageri) ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या (British Officer) स्वागतासाठी रचलेले गाणे असल्याचे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती समारंभाचा भाग म्हणून बुधवारी होन्नावर येथे आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.