Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel RescueEsakal

Uttarkashi Tunnel Rescue: मशीनपेक्षा वेगाने होतंय हाताने खोदकाम; बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा व्हिडिओ आला समोर

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 17 दिवस जीव मुठीत धरून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिशनमध्ये बिघाड झाला त्यामुळे मजुरांना बाहेर काढण्यास तेही अपयशी ठरले. मात्र, माणसाच्या आत्मविशावासासमोर कोणतेही आव्हान कठीण नाही. ऑगर मशिनने अडथळे निर्माण झाल्यानंतर सोमवारी रात्रीपासून मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

एएनआयने याचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये काही कामगार पाइपमधून मलबा बाहेर काढताना दिसत आहेत. 41 जीव वाचवण्यासाठीची त्यांची जिद्द या व्हिडीओमधून दिसून येत आहे. कोणत्याही मशीनपेक्षा त्यांचे हे काम महत्त्वाचे ठरत आहे. मजूरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंगचा सुरू आहे, याचा हा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. (Marathi Tajya Batmya)

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या मजूरांचं मानसिक आरोग्य तपासणार स्वदेशी 'रोबो', मिलिंद राज यांची माहिती

ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर, रैट माइनिंग करणाऱ्या काही तज्ञांना, ज्यांना रैट माइनर्स देखील म्हणतात, त्यांना सिल्क्यारा बोगद्यावर बोलावण्यात आले आहे. त्यांना हे नाव देण्यात आले आहे कारण ते वेगवान बोगदे खोदण्यात किंवा तयार करण्यात माहिर आहेत. सोमवारी त्यांनी ऑगर मशीनचे तुटलेले भाग बाहेर काढून कामाला सुरुवात केली. सकाळपर्यंत, त्याने खूप वेगाने काम केले आणि सुमारे 4-5 मीटर खोदले. आता फक्त ५ ते ६ मीटर खोदाईचे काम बाकी आहे.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका कधी? आधी यंत्र तुटले, आता हवामानाचा फटका..

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सतत मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सकाळी त्यांनी पुन्हा एकदा बोगद्यात जाऊन प्रगती पाहिली आणि कामगार लवकरच बाहेर येतील असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे 52 मीटर पाईप आत गेले आहेत, सुमारे 57 मीटर पाईप आत ढकलावे लागले आहेत. यानंतर आणखी एक पाईप बसवण्यात येणार आहे. पूर्वी स्टील वगैरे उपलब्ध होते, ते आता कमी झाले आहे. आता सिमेंट काँक्रीट सापडत असून ते कटरने कापले जात आहे.

त्याचप्रमाणे बोगद्याच्या वरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. वरून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर खोदणे आवश्यक आहे. त्यापैकी सुमारे 36 मीटर खोदकाम करण्यात आले आहे. आता कामगारांना बाहेर काढण्यासाठी एकाच वेळी पाच मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. लवकरत मजूर बाहेर येतील अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com