esakal | ब्रिटनची भारताला मदत; व्हेंटिलेटरची पहिली खेप पोहोचली
sakal

बोलून बातमी शोधा

britain

ब्रिटनची भारताला मदत; व्हेंटिलेटरची पहिली खेप पोहोचली

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील आरोग्य व्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता जगभरातील अनेक देशांकडून भारताला या संकटात मदतीचा हात दिला जात आहे. ब्रिटनकडून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पाठवण्यात येत असून त्यातील व्हेंटिलेटरची पहिली खेप मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचली. कोरोनाच्या या संकटकाळात इतर मित्रदेशांकडून भारताला मदत मिळत आहे. मंगळवारी पहाटे गरजेची औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य घेऊन ब्रिटनमधून एक विमान दिल्लीत पोहोचलं. परराष्ट्र मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 100 व्हेंटिलेटर्स आणि 95 ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आहेत.

सध्या आवश्यक उपरकरणे पुरवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. भारताच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सरकारी विभाग आणि दोन्ही देशांचे उच्चायुक्त, ब्रिटनमधील मूळ भारतीयांमध्येही यावर चर्चा सुरु आहे. आठवड्याच्या शेवटी एफसीडीओने घोषणा केली होती की, भारत सरकारसोबत चर्चेनंतर कोरोनाविरोधातील लढ्यात मदतीसाठी 600 हून अधिक वैद्यकीय उपकरणे भारतात पाठवण्यात येतील.

हेही वाचा: भारतातील स्थिती हृदयद्रावक; शक्य तेवढी मदत करतोय : WHO

याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं होतं की, 'कोरोनापासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी शेकडो ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्ससह महत्त्वाची उपकरणे ब्रिटनमधून भारतात पोहोचतील. ब्रिटन भारतासोबत एक मित्र आणि सहकारी म्हणून या कठीण काळात उभा आहे.' ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी भारत हा महत्त्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. सोमवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चाही केली. जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर त्यांनी ट्विटरवरून य़ाची माहिती दिली होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रिटनच्या सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफसीडीओ देणार असलेली पुढची खेप याच आठवड्यात मिळेल. यामध्ये 9 एअरलाइन कंटेनर लोड असणार आहेत. यात 495 ऑक्सिजन कॉन्सट्रेशन, 120 नॉन इंवेजिव्ह व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्युअल व्हेंटिलटर्सचा समावेश आहे.

loading image
go to top