esakal | भारतातील स्थिती हृदयद्रावक; शक्य तेवढी मदत करतोय : WHO
sakal

बोलून बातमी शोधा

who chief

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सोमवारी भारतातील कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली.

भारतातील स्थिती हृदयद्रावक; शक्य तेवढी मदत करतोय : WHO

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जिनिव्हा - भारतात कोरोनाचा कहर वाढला असून गेल्या आठवड्याभरात दर दिवशी तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सोमवारी भारतातील कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. भारतात सापडत असलेल्या नवीन रुग्णांची संख्या आणि मृत्यू यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, जागतिक आरोग्य संघटनासुद्धा भारताला या संकटातून वाचवण्यासाठी मदत करत आहे. भारतातील ही स्थिती हृदयद्रावक आहे.

देशात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. रुग्णाला ऑक्सिजन आणि बेड मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचंही चित्र अनेक ठिकाणी आहे. दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा असून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी इतर राज्यांसह उद्योगपतींकडे मदत मागितली आहे. तसंच दिल्लीत सात दिवस लॉकडाऊनही वाढवला आहे. टेड्रोस म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना ते सर्व करत आहे जे करता येईल. महत्त्वाची उपकरणे आणि आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. हजारो ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फॅब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि लॅब हेसुद्धा पुरवत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनं असंही सांगितलं की, पोलिओ आणि टीबीसह इतर मोठ्या कार्यक्रमातील 2600 पेक्षा जास्त तज्ज्ञांना भारताच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI

याआधी भारत कोव्हॅक्स मोहिमेंतर्गत इतर देशांना लस देत होता. रुग्णांची संख्या वाढण्याआधी सीरमच्या लशीची निर्यात कोव्हॅक्स अंतर्गत केली जात होती. मात्र भारतातील परिस्थिती बिघडताच लस पाठवणं थांबवण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि गावी यांनी सांगितलं की, भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि यापार्श्वभूमीवर रोखलेली लशीची निर्यात यामुळे कोव्हॅक्ससाठी 9 कोटी डोस कमी पडत आहेत. कोव्हॅक्स अंतर्गत 92 गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात होती.

loading image
go to top