Odisha : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून रशियाच्या सर्वात श्रीमंत नेत्याचा मृत्यू; पुतिन यांच्या पक्षाचे होते खासदार

दोन दिवस आधी त्यांच्या एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.
Vladimir Putin Pavel Antonov
Vladimir Putin Pavel Antonovesakal

दोन दिवस आधी त्यांच्या एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.

ओडिशातील रायगडमधून (Odisha Raigarh) एक धक्कादायक बातमी समोर आलीये. इथं भारतात भेट देण्यासाठी आलेल्या दोन रशियन पर्यटकांचा आठवडाभरात मृत्यू झालाय.

रशियातील सर्वाधिक मानधन घेणारे राजकारणी पावेल अँटोनोव्ह (Pavel Antonov) यांचा शनिवारी ओडिशातील हॉटेलच्या (Odisha Hotel) खिडकीतून पडून मृत्यू झाला आहे. याच्या दोन दिवस आधी म्हणजे, गुरुवारी भारतात एका पार्टीदरम्यान त्यांच्या एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.

Vladimir Putin Pavel Antonov
Rahul Gandhi : प्रभू रामाशी राहुल गांधींची थेट तुलना; खुर्शीद म्हणाले, रामाची भूमिका घेऊनच आम्ही..

विशेष बाब म्हणजे, पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी पुतिन यांच्यावर अनेक वेळा टीका केलीये. अँटोनोव्ह हे रशियाच्या व्लादिमीर क्षेत्राचे खासदार होते आणि 2019 मध्ये रशियाचे सर्वाधिक पगार घेणारे राजकारणी होते. त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते भारतात आले होते.

Vladimir Putin Pavel Antonov
Coronavirus : चीनला जाताय? मग, परदेशी प्रवाशांबाबत जिनपिंग सरकारनं घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या कोणता?

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून अँटोनोव्ह यांचा मृत्यू झाला. 65 वर्षीय अँटोनोव्ह शनिवारी हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांचा सहप्रवासी व्लादिमीर बिदेनोव 22 डिसेंबर रोजी त्याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्याजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या होत्या. त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com