गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. 

बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत. 

बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे.

गोकाकमध्ये तिरंगी लढत

गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत. 

अथणीत माजी आमदार समोरासमोर

अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे. 

मतदारसंघनिहाय मतदार 
अथणी*2,17,974 
कागवाड*1,85,443 
गोकाक*2,42,124 

बंदोबस्त असा 
6 ः उपअधीक्षक 
12 ः पोलिस निरीक्षक 
33 ः उपनिरीक्षक 
62 ः साहाय्यक उपनिरीक्षक 
1143 ः पोलिस कॉन्स्टेबल 
191 ः होमगार्ड 
2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग) 
15 ः डीएआर (तुकडी) 
15 ः केएसआरपी (तुकडी) 
8 सीएपीएफ (तुकडी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting In Gokak Kagwad Athani Assembly By Election