

Shashwat Acharya Maharaj
Esakal
सोशल मीडियावर सध्या वृंदावनातील एका १९ वर्षीय जेन झी बाबाची जोरदार चर्चा होत आहे. अवघ्या १९ वर्षांचा तरुण त्याच्या लूकने लक्ष वेधून घेत आहे. खांद्यापर्यंत कुरळे केस, पांढरा कुर्ता आमि कपाळावर वैष्णव टिळा लावलेल्या या महाराजांचं नाव शाश्वत आचार्य महाराज असं आहे. सोशल मीडियावर त्यांना जेन झी बाबा म्हटलं जात आहे. 'Facecardaeshwar Guruji' असंही नाव त्यांना दिलं जात आहे.