Parag Desai: वाघ-बकरी चहाच्या मालकाचं निधन कुत्रं चावल्यानं नव्हे तर...; रुग्णालयाचं स्पष्टीकरण

कुत्रा चालवल्यानं त्यांचं निधन झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
Wagh Bakri Tea
Wagh Bakri TeaSakal
Updated on

अहमदाबाद : वाघ-बकरी चहा कंपनीचे मालक पराग देसाई यांचं निधन कुत्रं चावल्यानं नव्हे तर वेगळ्याच कारणामुळं झाला आहे, असं स्पष्टीकरण शाल्बी हॉस्पिटलनं दिलं आहे.

बेशुद्ध पडल्यानंतर याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी यासंदर्भात ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये कुत्र्याच्या चावल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. (Wagh Bakri owner Parag Desai dies of brain haemorrhage)

रुग्णालयाचं स्पष्टीकरण

अहमदाबादच्या शाल्बी हॉस्पिटलनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, "रुग्णाला अर्थात पराग देसाईंना संध्याकाळी 6च्या सुमारास आपत्कालीन विभागात आणण्यात आलं. त्यावेळी ते बेशुद्ध होते आणि प्रतिसाद देत नव्हते. (Marathi Tajya Batmya)

कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर ते खाली पडले, असं सांगण्यात आलं परंतु वरवर पाहता, कुत्र्यानं चावा घेतल्याच्या कोणत्याही खुणा त्यांच्या शरिरावर दिसून आलेल्या नाहीत. (Latest Marathi News)

Wagh Bakri Tea
Israel-Hamas War: हमासजवळ केमिकल हत्यारं! इस्राइलचा खळबळजनक दावा; जगावर भीषण संकट

कुत्रा चावल्याच्या अनेक घटना

सीटी स्कॅनमध्ये मेंदूला तीव्र मार लागल्यानं त्यांना ब्रेन हॅमरेज झालं. पण अलिकडच्या काळात, कुत्रा चावल्यामुळं किंवा भटक्या प्राण्यांमुळं झालेल्या अपघातांत गंभीर जखमी झालेले किंवा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरण आमच्यासमोर आली आहेत, असंही हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com