esakal | भारत जागा हो! कोरोना लाटेची स्थिती युद्धासारखी; माजी लष्करप्रमुखांची कळकळीची विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

Political Rally

"भारत जागा हो! कोरोना लाटेची स्थिती युद्धासारखी"; माजी लष्करप्रमुखांची कळकळीची विनंती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत असलेल्या मृत्यूंप्रकरणी काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक सभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीकास्त्र सोडलं. ट्विट करुन रविवारी जनरल मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: देशात युद्धपातळीवर रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस

"कारगील युद्धातील मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू दररोज कोरोनामुळे भारतात होत आहेत. दोन महिने चाललेल्या कारगिलच्या युद्धातही इतकी जीवितहानी झाली नव्हती. आपला देश सध्या युद्धजन्य स्थितीतून जात आहे. शनिवारी १,३३८ भारतीयांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला. एका दिवसातील ही संख्या कारगील युद्धातील मृतांपेक्षा अडीचपटींहून अधिक आहे. देशाचं या युद्धाकडे लक्ष आहे का?" असा संतप्त सवालही जनरल मलिक यांनी विचारला आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग; डाग्नोस्टिक सेंटर्सचं निरीक्षण

पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली आणि गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन यावरही जनरल वेदप्रकाश यांनी टीकास्त्रा सोडलं. त्यांनी म्हटलं, सध्याच्या बिकट परिस्थितीतही देशात निवडणूक सभा, धार्मिक मेळावे, शेतकरी आंदोलनं सुरु आहेत. भारत जागा हो! अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा: रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा येणार; चार कंपन्याकडून इंजेक्शन मिळणार

देशात रविवारी दिवसभरात विक्रमी २.६१ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १.४७ कोटींवर पोहोचली. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची संख्या १,७७,१५० झाली आहे. यात गेल्या चोवीस तासात १,५०१ मृत्यू झाले आहेत.