कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Uber-Ola Cab Booking: जर तुम्ही ओला, उबर किंवा इतर कोणत्याही ॲपवरून कॅब बुक केली आणि बुकिंग पूर्ण होण्यापूर्वी स्क्रीनवर टीप देण्याचा किंवा अतिरिक्त पैसे देण्याचा पर्याय दिसत असेल, तर आता असे होणार नाही.
Uber, Ola Must Remove Pre-Ride Tip Option; Passengers Can Tip After the Ride

Uber, Ola Must Remove Pre-Ride Tip Option; Passengers Can Tip After the Ride

ESakal

Updated on

केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उबर, ओला आणि इतर कॅब एग्रीगेटर्सना आता प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी प्रवाशांकडून टीप मागता येणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व मोटार वाहन एग्रीगेटर्सना त्यांच्या ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रवासापूर्वी टिप मागण्याचा पर्याय काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com