गुंड गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचला...

वृत्तसंस्था
Monday, 28 September 2020

उत्तर प्रदेश पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी बक्षिस जाहिर केले होते. पण, गुंडच गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचला आणि हात जोडून पोलिसांसमोर उभा राहिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संभाल: उत्तर प्रदेश पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी बक्षिस जाहिर केले होते. पण, गुंडच गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचला आणि हात जोडून पोलिसांसमोर उभा राहिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Video: लाकूडतोड्याने कापला शेंडा; पुढे काय झाले पाहा...

पोलिस चौकीत पोहचलेल्या गुंडाने पाटीवर लिहीले होते की, 'मला गोळी मारू नका, माझी मुलं लहान आहेत. मी फळ विकून उदरनिर्वाह करत आहे. मी केलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा.' गळ्यात पाटी अडकून पोलिस चौकीत पोहचल्यावर हात जोडून पोलिसांसमोर उभा राहिला. पोलिसांनी त्याला न मारण्याचे सांगत अटक केली. संभाल पोलिसांनी ट्विटवरून त्याचे छायाचित्र व्हायरल केले आहे. आत्मसमर्पन केलेल्या गुंडाचे नाव नइम असून, त्याच्यावर 15 हजार रुपयांचे बक्षिस होते.

संभाल पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धरमपाल सिंग यांनी सांगितले की, 'नइम हा गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले होते. मात्र, त्याला पडकण्यात यश आले नव्हते. अखेर रविवारी (ता. 27) आत्मसमर्पण करण्यासाठी तोच पोलिस स्टेशनमध्ये आला. नइमला अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wanted criminal surrender to sambal police at uttar pradesh