
Waqf Amendment Law: नव्या वक्फ सुधारणा कायद्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं दोन महत्वाच्या तरतुदींवर आक्षेप घेत त्यावर ७ दिवसांत केंद्र सरकरानं उत्तर द्यावं, असे निर्देश दिले. तसंच तोपर्यंत हा कायदा लागू करणार नसल्याचं आश्वासन केंद्रानं कोर्टाला दिलं. या आजच्या सुनावणीवर वक्फ बोर्डाच्याबाजूनं आवाज उठवणारे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.