Waqf Board Property Origin: वक्फ बोर्डाकडे एवढी संपत्ती आली कुठून? वाट्टेल त्या मालमत्तेवर हक्क सांगता येतो का? इस्लाममध्ये आहेत संदर्भ...

Waqf Property Ownership Dispute: वक्फ नेमकं काय आहे? याचा मुस्लिमांशी काय संबंध आहे? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
Waqf Board
Waqf Boardesakal
Updated on

Waqf Board Land Claims: बाबरी मश्चिद आणि राम जन्मभूमीचा मुद्दा आला की सुन्नी वक्फ बोर्डाचा नेहमी उल्लेख होतो. मागे योगी सरकारने वक्फ संपत्तीचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर वक्फ (Waqf) नेमकं काय आहे? याचा मुस्लिमांशी काय संबंध आहे? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

thequint च्या रिपोर्टनुसार, रेल्वे आणि सुरक्षा विभागानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक संपत्ती आहे. वक्फ हा एक अरबी शब्द आहे. अशी वस्तू किंवा संपत्ती जी अल्लाहच्या नावाने दान केली जाते. त्याला आपण दान म्हणू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती आपली संपत्ती किंवा जमीन वक्फ बोर्डाला दान देऊ शकतो. यावर वक्फ बोर्ड हॉस्पिटल, शाळा, काँलेज, स्मशानभूमि, आश्रम बनवू शकते.

Waqf Board
Viral Video: चंद्राबाबूंच्या शपथविधीवेळी स्टेजवरच राडा! अमित शाहांनी माजी राज्यपालांना...; नेमकं काय घडलं पाहा

इस्लामिक इतिहासात सापडतो उल्लेख

इस्लामिक इतिहासामध्ये हजरत उमरला खैबरच्या लढाईमध्ये जमिनीचा एक तुकडा मिळाला होता. त्याने मोहम्मद पैगंबरांना याचं काय करायचं याची विचारणा केली होती. पैगंबरांनी सांगितलं की, या जमिनीला असंच ठेवण्यात यावे आणि यातून मिळणारा फायदा दान म्हणून देण्यात यावा किंवा लोकांच्या फायद्यासाठी याचा वापर करावा.

यामध्ये काही अटी आहेत

- याला विकता येणार नाही

- कोणालाही ती वारसाने देता येणार नाही

एकदा वक्फ बोर्डाला दिलेली जमीन परत घेता येणार नाही. माझ्या आजोबांनी दिली म्हणून ती जमीन परत करा असं कोणी म्हणू शकत नाही. वक्फ बोर्ड या जमिनीला विकू देखील शकत नाही. मात्र, याला किरायाने किंवा लीजवर दिलं जाऊ शकतं. त्यासाठी देखील वेगळे नियम आहेत.

Waqf Board
Violinist Cat Viral : 'व्हायोलिनवाली मांजर' होतीये सोशल मीडियावर तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहिलात काय?

वक्फ बोर्डाला कायदेशीर मान्यता आहे का?

पहिल्यांदा १९५४ मध्ये वक्फ कायदा मंजूर करण्यात आला होता. त्याला १९९५ मध्ये मागे घेण्यात आले. या कायद्याने वक्फ बोर्डाला संपत्ती सांभाळण्यासाठी जास्त अधिकार देण्यात आले होते.

वक्फची संपत्ती सांभाळण्यासाठी वक्फ बोर्ड आणि सेंट्र्ल वक्फ काऊंसिल असते. मुस्लिमांची दान केलेली सर्व संपत्ती वक्फमध्ये मोडत नाही. संपत्ती वक्फमध्ये घेण्यासाठी त्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागते. दान कशासाठी केलं जात आहे हे वक्फ बोर्डाला सांगावं लागतं.

वक्फ बोर्डाची संपत्ती किती?

३० डिसेंबर २०२२ पर्यंत नोंद असल्यानुसार, देशातील ३२ वक्फ बोर्डाकडे ३,५४,६२८ वक्फ असेट्स आहेत, याशिवाय ८,५८,२३३ स्थावर मालमत्ता आणि १६,६२८ जंगम मालमत्ता आहे. भारत सरकारने वक्फ बोर्डाला संपत्तीचे डिजिटल रिकॉर्ड ठेवण्यास सांगितले होते.

वक्फ बोर्डाची संपत्ती तुम्हाला wamsi.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल. रिपोर्टनुसार, वक्फ बोर्डाची संपत्ती खूप जास्त असू शकते. कारण अनेक संपत्तीची नोंदच झालेली नाहीये. शिवाय वक्फच्या संपत्तीवर अनेकदा दुसऱ्यांकडून ताबा मिळवला जातो.

वक्फच्या बोर्डाची संपत्ती ही केवळ मुस्लिमांसाठी नसते. यावर उभे करण्यात आलेल्या यूनिव्हर्सिटी आणि हॉस्पिटलचा फायदा दुसऱ्या समाजाचे लोक देखील घेऊ शकतात. इस्लाम धर्माला मानणाऱ्या धार्मिक व्यक्तीची संपत्ती वक्फ बोर्ड स्वीकार करु शकते. बिगर-मुस्लीम किंवा मुस्लिमांच्या खासगी संपत्तीवर दावा करण्याचा वक्फ बोर्डाला अधिकार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com