कोण आहेत वसीम रिझवी? कुराणमधील २६ आयत हटविण्याची मागणी का केली?

Waseem_Rizvi
Waseem_Rizvi

नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे सर्वांच्या नजरा उंचावल्या गेल्या आहेत. कुराणमधील २६ आयत (अध्याय) हटवावेत, यासाठी त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कुराणमधील विशेष आयते (श्लोक) मानवाला हिंसक बनवत आहेत तसेच दहशतवादाचे शिक्षण देत आहेत. आणि याचाच दाखला देत जगभरात दहशतवादाचे शिक्षण दिले जात आहे, असं मत रिझवी यांचं आहे. 

वसीम रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. शिया आणि सुन्नी समुदायाच्या एका मोठ्या इस्लामिक परिषदेत रिझवी म्हणाले की, कुराणमधील २६ आयते रद्द करण्याबाबत मला इस्लाममधून बेदखल करण्यात आलं आहे. तसेच देशातील कोणत्याच कब्रस्तानमध्ये माझे शरीर पुरण्यास परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, रिझवी यांनी लखनऊमधील तालकटोरा येथील कब्रस्तानमध्ये एक थडगे अगोदरच रजिस्टर करून ठेवले आहे, ज्याला हयाती कब्र असे म्हटले जाते. बरेच मुस्लिम स्मशानभूमीत आपल्या आवडीची जागा खरेदी करतात, आणि मृत्यूनंतर याच ठिकाणी त्यांचा मृतदेह पुरावा यासाठी त्यांच्या नावाचा दगड (थडगे) ठेवला जातो, पण रिझवींच्या या मागणीनंतर काही लोकांनी त्यांच्या थडग्याचे नुकसान केले आहे. 

वसीम रिझवी हे सध्या भूमिगत झाले आहेत. ते म्हणाले की, ''कुटुंबाने माझी साथ सोडली आहे. पत्नी, मुले, भाऊ या सर्वांनी मला सोडले आहे. वसीमचा कुटुंबाशी काही संबंध नाही, अशा आशयाचा व्हिडिओही वसीम यांच्या भावाने प्रदर्शित केला आहे. वसीम हे इस्लामविरोधी झाले असून ते जे काही बोलत आहेत, त्याचा कुटुंबाशी काही संबंध नाही,'' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करेल का हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. दुसरे म्हणजे कुराण शरीफमधील २६ श्लोकांतून खरोखरच दहशतवादाची शिकवण दिली जाते का? याबाबतही अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर सुनावणी घेण्याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालय कोणत्याही धार्मिक ग्रंथातील कोणत्याही भाग काढून टाकण्याबाबत काम करू शकत नाही. जर याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली तर इतर धर्मांतील लोकही अशा विविध मागण्या करण्यात सुरवात करतील आणि नवी परंपरा जन्माला येईल. 

सध्यातरी सर्वोच्च न्यायालय ही याचिका स्वीकारणार नाही, असेच दिसत आहे. उरला प्रश्न २६ आयते खरंच दहशतवादाची शिकवण देतात का? तर इस्लाममध्ये चार प्रकारच्या जिहादचा उल्लेख करण्यात आला आहे. इस्लाममध्ये हल्ला करण्यास परवानगी देण्यात आली नाही, पण बचाव करण्यासाठी हल्ला करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुस्लिमांना द्वेषाचे प्रतीक बनवण्यासाठी आणि समाजाचे ध्रुवीकरण वाढविण्याचा उद्देश रिझवींचा आहे. यामुळे रिझवींशी ज्यांचे नातेसंबंध जोडले गेले आहेत, त्यांचा फायदा होऊ शकेल, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com