esakal | Corona Update - परिस्थिती चिंताजनक, महाराष्ट्रात झपाट्यानं वाढतायत रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Update

राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुण्यात असून ही संख्या २६,४६८ इतकी आहे. त्यानंतर मुंबईत १३,३०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Update - परिस्थिती चिंताजनक, महाराष्ट्रात झपाट्यानं वाढतायत रुग्ण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates: पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात विक्राळ रुप घ्यायला सुरवात केल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. सोमवारी (ता.१५) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात सुमारे १५,०५१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २३,२९,४६४ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत एकूण ४८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ५२,९०९ वर पोचली आहे. तसेच दिवसभरात १०,६७१ जणांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २१,४४,७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण १,३०,५४७ एवढी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे. 

सुरक्षा दलाने जैशच्या कमांडरचा केला खात्मा; तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर यश​

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.०७ टक्के झाले आहे. सध्या ६,२३,१२१ कोरोना बाधित सध्या होम क्वॉरंटाइन असून ६११४ बाधित रुग्णांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. 

लॉकडाउन टाळायचा असेल तर...; काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?​

सर्वाधिक रुग्ण पुण्यात 
दरम्यान, राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुण्यात असून ही संख्या २६,४६८ इतकी आहे. त्यानंतर मुंबईत १३,३०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमध्येही दिवसभरात १७१२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचे संक्रमण झालेल्या ९० टक्के नव्या केसेस या मोठ्या इमारतींमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 

म्हात्रे पॅलेस परिसरातील सुमारे २२० इमारती सील करण्यात आल्या आहेत. राज्यात औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, पुणे, नांदेड, ठाणे, पालघर, जळगाव, नागपूर, लातूर, धुळे, वर्धा, नाशिक या जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने निर्बंध वाढविण्यात आले आहेत.  

NOTA ला सर्वाधिक मतं मिळाल्यास निवडणूक रद्द व्हावी?; सुप्रीम कोर्टाची केंद्र, ECकडे विचारणा​

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली, मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image