esakal | न्यायाधिशाची हत्या की आपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधिशाची हत्या की अपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल

न्यायाधिशाची हत्या की अपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

झारखंडमधील धनबाद जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या निधनाने सध्या सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला आहे. त्यांची हत्या झाली की तो अपघात होता? यावर पोलिस तपास करत आहेत. याबाबतचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॉर्निंग वॉकला गेलेले न्यायाधिश उत्तम आनंद यांना रणधीर वर्मा चौकाजवळ एका ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. न्यायाधीश उत्तम आनंद रंजय सिंह हत्याकांडाची सुनावणी करत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रकरणी आरोपीची जमानत फेटाळली होती. यातूनच त्यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी पहाटे पाच वाजता न्यायाधीश उत्तम आनंद मॉर्निंग वॉकला निघाले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये ते रस्त्याच्या एका बाजूने चालत होते. संपूर्ण रस्ता रिकामा असतानाही रिक्षा वाल्याने जवळ जाऊन त्यांना जोराचा धक्का दिला. ते रस्त्याच्या बाजूला कोसळल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. धनबाद जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या झाली आहे की अपघात? याबाबत पोलिस गोंधळात आहेत. CCTV मध्ये जाणूनबुजून त्यांना धक्का दिल्याचं दिसत आहे. पाहा व्हिडिओ ......

हेही वाचा: 'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

ऑटोने धडक दिल्यानंतर न्यायाधीश उत्तम आनंद रस्त्याच्या बाजूला पडले. त्यांना हालताही येत नव्हते. तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णांलयात दाखल केलं. मात्र, त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.

loading image
go to top