esakal | मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे - शिवसेनेचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नैसर्गिक आपत्तीतही केंद्रीय मंत्री नारायण राणे राजकारण करत आहेत. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानेच कोकणवर ही आपत्ती ओढावली. ते पांढऱ्या पायचे आहेत, अशा घणाघात शिवसेना उपनेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव येथे पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी गुलाबरावर पाटील यांनी राणेंच्या वक्तव्यावर निशाणा साधला.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात आले होते. यावेळी त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांवर संकट ओढावलं आहे. या आपत्तीमधून सावरण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. या परिस्थितीचा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करत आहेत. पण या नैसर्गिक आपत्तीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यामुळेच मंत्री झाल्यामुळे कोखणवर ही आपत्ती ओढावली आहे.'

हेही वाचा: ...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान

एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी राजकीय आखाडा हा रिकामाच असतो. पण अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे पहिलं कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top