Priyanka Gandhi : वायनाड हे माझ्यासाठी कुटुंबच; काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

वायनाड हे माझ्या कुटुंबाप्रमाणे असून, येथील नागरिकांसाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केले.
Priyanka-gandhi
Priyanka-gandhisakal
Updated on

वायनाड - वायनाड हे माझ्या कुटुंबाप्रमाणे असून, येथील नागरिकांसाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केले. केरळमधील वायनाड येथे होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांनी बुधवारी निवडणूक अर्ज भरला. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांका यांचे पती रॉबर्ट वद्रा आणि त्याचे पुत्र रेहान उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com