Wayanad: राहुल गांधींच्या वायनाडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे लोकांना आवाहन

Maoists In Wayanad: के सुरेंद्रन यांनी लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 5 निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, यातील एकाही निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही.
Maoists In Wayanad|Loksabha Election
Maoists In Wayanad|Loksabha ElectionEsakal

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. केरळमधील वायनाडमध्ये संशयित सशस्त्र माओवाद्यांच्या चार सदस्यीय गटाने बुधवारी लोकांना लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. ही घटना थलप्पुझा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात घडली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या भागातील माओवाद्यांच्या परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कंबामाला येथे पाठवण्यात आले.

स्थानिक लोकांनी सांगितले की, सकाळी 6.15 वाजता माओवादी आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Maoists In Wayanad|Loksabha Election
Solapur Loksabha : प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी आज राहुल गांधींची सभा ; एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजन

तेथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी सांगितले की, माओवादी त्यांच्या गणवेशात होते आणि त्यांच्याकडे बंदुकाही होत्या. सुमारे 20 मिनिटे ते परिसरात थांबले. मात्र, नंतर माओवाद्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला, ज्यामध्ये ते स्थानिक लोकांशी बोलताना दिसत होते.

व्हिडिओनुसार, माओवादी जेव्हा परिसरात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित असलेले बहुतांश लोक मजूर होते.

Maoists In Wayanad|Loksabha Election
Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भुजबळांवर दबाव; निर्णय मागे घेण्याची एकमुखी मागणी

दरम्यान वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रन्टच्या एनी राजा आणि भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन हे निवडणूक लढवत आहेत.

के सुरेंद्रन यांनी लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 5 निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, यातील एकाही निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com