
यूपीत 2017 च्या तुलनेत भाजपला मोठा विजय मिळेल - केशव प्रसाद मौर्य
नवी दिल्ली : आगमी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 2017 च्या तुलनेत यूपी विधानसभा निवडणुकीत आम्हाला मोठा विजय मिळेल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला आहे. ते भाजप निवडणूक समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीत 172 जागांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 14 जानेवारी रोजी जारी होणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
सात टप्प्यात होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. या 58 जागांवर गेल्या वेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या आणि राष्ट्रीय लोकदलाला एक जागा मिळाली होती. तर सपाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. भाजपचा मित्रपक्ष अपना दल (एस) ने नऊ तर सुभाषसपाला चार जागा जिंकता आल्या होत्या.
स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम
यूपीमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपला अनेक धक्के बसत असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम केला आहे. भाजप सरकार दलित, मागास, तरुण, शेतकरी, बेरोजगार आणि वंचितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनमंत्री दारा सिंह चौहान यांनीही राजीनामा दिला आहे. तर, गुरुवारी योगी सरकारमधील आणखी एक मंत्री धरमसिंह सैनी यांनी देखील राजीनामा दिला आहे.
Web Title: We Are Glorious Victory In The 2022 Assembly Elections In Up Says Deputy Cm Keshav Prasad Maurya In Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..