esakal | Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

k c tyagi

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे प्रवक्ता केसी त्यागी यांनी म्हटलंय की, आम्हाला तेजस्वी यादव यांनी नव्हे तर नैसर्गित आपत्तीने हरवलं आहे.

Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Bihar election 2020

पाटना :  बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सुरवातीच्या कलांमध्ये राजद-काँग्रेसची महागठबंधन आघाडीवर होती. मात्र आता पुन्हा जेडीयू-भाजपच्या एनडीएने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे प्रवक्ता केसी त्यागी यांनी एकप्रकारे आपला पराभव स्विकारला आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला तेजस्वी यादव यांनी नव्हे तर नैसर्गित आपत्तीने हरवलं आहे.

त्यागी यांनी म्हटलंय की ना नितीश कुमार हा ब्रँड गायब झालाय, ना तेजस्वी यादव प्रस्थापित झाले आहेत. आम्हाला तेजस्वी यादवांनी नव्हे नैसर्गित आपत्तीने हरवलं आहे. सध्या बिहारमधील निवडणुकीचे जे कल येत आहेत, त्यामध्ये आधी तेजस्वी यादव पुढे होते. तेंव्हा त्यागी यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र आता नितीश कुमार यांची आघाडी दिसून येत आहे. खरं तर अद्याप निकाल स्पष्ट झालेला नाहीये. मात्र, कल सातत्याने पुढे-मागे होताना दिसतायत. 

हेही वाचा - Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा

अशातच, जेडीयूचे प्रवक्ते यांनी पराभव स्विकारण्याच्या सुरात म्हटलंय की, आम्ही लोकांच्या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही राजद अथवा तेजस्वी यादव यांच्यापासून हरलो नाहीये तर राष्ट्रीय आपत्तीमुळे हरलो आहोत. आम्ही बिहारच्या गेल्या 70 वर्षांच्या खराब अवस्थेचा परिणाम  भोगत आहोत. एनडीएबाबत बोलायचं झालं तर जेडीयूपेक्षा भाजप आघाडीवर आहे. मात्र, सध्या महागठबंधन आणि एडीएमध्ये चुरशीची लढत सध्या सुरु आहे.