esakal | Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा
sakal

बोलून बातमी शोधा

shahwnawz hussain

शाहनवाज हुसैन यांनी असाही दावा केलाय की, बिहारमध्ये आमचंच सरकार बनणार आहे.

Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : बिहार निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आज मतमोजणी होणार आहे आणि बिहारचे भवितव्य ठरणार आहे. मात्र, निकाल लागायच्या आधीच विजयाबाबतच्या वल्गना समोर येऊ लागल्या आहेत. बिहार निवडुकीचे सगळे एक्झीट पोल्स हे महागठबंधनच्या बाजूने झुकलेले दिसतायत. मात्र, या एक्झीट पोल्सना एनडीएचे नेते अमान्य करताना दिसतायत. भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसैन यांनी निकाल यायच्या आधीच महागठबंधनवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, अजून काही वेळ महागठबंधनच्या लोकांना आनंदोत्सव साजरा करु द्या कारण बिहारची जनता यांना स्वीकारणार नाहीये. असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. 

हेही वाचा - Bihar Result Live Update: नितीशकुमार चौथ्यांदा CM होणार की तेजस्वी बाजी मारणार ?

महागठबंधनकडून लाडू बनवण्याची तयारी सुरु आहे. यावर शाहनवाज हुसैन यांनी म्हटलंय की अजून थोडा वेळ महागठबंधनच्या लोकांना लाडू खाऊ द्या मात्र निकाल आल्यानंतर त्यांना हे लाडू पचणार नाहीयेत. सोबतच बिहारची जनता महागठबंधनला कधीची पचवू शकणार नाहीये, असंही त्यांनी म्हटलंय. शाहनवाज यांनी म्हटलंय की बिहारच्या लोकांनी राष्ट्रीय जनता दलाचा शासनकाळ पाहिला आहे. 
शाहनवाज हुसैन यांनी छातीठोकपणे हे वक्तव्य केलं असलं तरीही बिहारमध्ये भाजपाच्या कार्यालयात शांतताच असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - Bihar election 2020 : बिहार विधानसभेची आज कडक बंदोबस्तात मतमोजणी

शाहनवाज हुसैन यांनी असाही दावा केलाय की, बिहारमध्ये आमचंच सरकार बनणार आहे. मतमोजणी सुरु झाल्याबरोबर लोकांना याचं उत्तर बरोबर मिळेल. आम्ही बिहार जिंकणार आहोत आणि महागठबंध हारत आहे. मात्र, एक्झीट पोलचे आकडे असं सांगताहेत की, महागठबंधनचं सरकार येण्याची सर्वांत जास्त शक्यता आहे. त्यामुळे सर्वांत तरुण मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनतील अशी राजदच्या गटाची आशा आहे.