esakal | "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा ही हवामानासंबंधी चर्चा नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा ही हवामानासंबंधी चर्चा नाही"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असताना त्यामुळे अद्याप अनेक निर्बंध कायम असतानाही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाही. लोकांना या विषयाचं गांभीर्य नसल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी काळजी व्यक्त केली आहे.

लव अग्रवाल यांनी म्हटलं की, "माझी सर्वांना विनंती आहे की, त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत गंभीर रहायला हवं. आपल्याकडे जेव्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरु असते तेव्हा आपण ही चर्चा हवामानाच्या अपडेट्स प्रमाणं घेतो. या चर्चेचं गांभीर्य आणि याबाबतच्या आपल्या जबाबदाऱ्या आपण समजून घेत नाही."

loading image