esakal | 'भारत जवळचा सहकारी!' डेन्मार्कच्या PM भारत दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

'भारत जवळचा सहकारी!' डेन्मार्कच्या PM भारत दौऱ्यावर

'भारत जवळचा सहकारी!' डेन्मार्कच्या PM भारत दौऱ्यावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांचं आज शनिवारी राष्ट्रपती भवनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रपती भवनमध्ये पोहोचल्यानंतर फ्रेडरिकसेन यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की, आम्ही भारताला सर्वांत जवळचा सहकारी समजतो. मी या दौऱ्याला डेन्मार्क-भारत या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसाठी एक मैलाचा दगड समजते. पंतप्रधान फ्रेडरिकसन आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी भारतात आल्या आहेत. या दरम्यान त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्या द्विपक्षीय बैठक देखील करतील.

डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा कार्यक्रम

  • सकाळी साडेनऊ वाजता राजघाटमध्ये महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहतील

  • सकाळी 10:10 वाजता हॉटेल आयटीसी मौर्यामध्ये परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांची भेट घेतील.

  • सकाळी साडेअकरा वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतील.

  • दुपारी साडेबारा वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये चर्चा आणि प्रेस स्टेटमेंट होईल

  • सायंकाळी 4:45 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

  • रविवारी आग्रामधील ताजमहल पाहतील.

loading image
go to top