esakal | सहानुभूतीसाठी ममतादिदींची हत्या आम्हाला नको, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee main.png

ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्रीय सुरक्षा संस्थेकडून स्वतःसाठी सुरक्षा घ्यावी.

सहानुभूतीसाठी ममतादिदींची हत्या आम्हाला नको, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण आत्ताच तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि विरोधी पक्षाची भूमिका निभावत असलेल्या भाजपत सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. याचदरम्यान पश्चिम बंगालमधील बॅरकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी टीएमसीच्या सर्वेसर्वो तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्रीय सुरक्षा संस्थेकडून स्वतःसाठी सुरक्षा घ्यावी. आमची इच्छा नाही की, त्यांच्या भाच्याला बंगालच्या लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी त्यांची हत्या व्हावी. 

जर भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही तर ममता बॅनर्जींची हत्या केली जाऊ शकते, असे वक्तव्य ममता सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी डिसेंबरमध्ये केले होते. त्यांच्या या विधानानंतर पश्चिम बंगालचे राजकारण तापले होते. भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने हिंसाचार झाल्याचे वृत्त येत होते. यामध्ये दोन्ही पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यूही झाला आहे. 

हेही वाचा- मुंबई काँग्रेसमध्ये भाईंवर नियंत्रण हांडोरेंचे;श्रेष्ठींच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनीही सुब्रत मुखर्जी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते की, राज्य सरकारला जनतेचा पाठिंबा मिळत नाहीये. सहानुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारची शेरेबाजी केली जात आहे. त्या म्हणत आहेत की, काही लोक त्यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत. परंतु, कोणी असा गुन्हा का करेल ? विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी ते अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा- नरेंद्र मोदी अहंकारी नेते; सोनिया गांधींची बोचरी टीका