आपण सत्याला ओळखणाऱ्या ऋषींचे वंशज आहोत - मोहन भागवत | Rss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohan bhagwat

आपण सत्याला ओळखणाऱ्या ऋषींचे वंशज आहोत - मोहन भागवत

sakal_logo
By
दीनानाथ परब

रायपूर: "स्वत:ला ओळखा मी कोण आहे. आपण सत्याला ओळखणाऱ्या ऋषींचे वंशज आहोत. संपूर्ण जगाला कुटुंब मानणारे लोक आहोत. सगळ्या जगाला आपल्याला व्यवहारातून सत्य द्यायचे आहे. पुन्हा देश-विदेशात, सगळ्या जगात जायचे आहे" असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (Rss chief) मोहन भागवत (Mohan bhagwat) म्हणाले. शुक्रवारी छत्तीसगडमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते. "विज्ञान चंद्र-मंगळावर जाणार असेल, तर आम्ही सुद्धा त्यांच्या मागोमाग तिथेही जाऊ. सगळ्यांच्या व्यवहाराचं बिघडलेलं संतुलन पुन्हा मार्गावर आणणारा धर्म देऊ. जो पर्यावरणाबरोबरही चांगल्या पद्धतीने राहणं शिकवतो" असे मोहन भागवत म्हणाले.

"धर्म पंथ, पूजा जात-पात जन्म, देश, भाषा यात इतकी विविधता असूनही मिळून-मिसळून रहायला शिकवतो. कोणाचीही पूजा करण्याची पद्धत बदलल्याशिवाय, भाषा बदलल्याशिवाय चांगला मनुष्य बनवतो. जो सगळ्यांना आपलं मनातो, कोणालाही परक मानत नाही. जे त्याला आपलं मानत नाही, त्यांनाही तो परक समजत नाही, असा आपला हिंदू धर्म आहे" असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

हेही वाचा: ITR भरण्याचे 8 मोठे फायदे! इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे?

"हिंदू धर्माचे विचार संपूर्ण जगात पसरवायचे आहेत. आपल्याला मतांतरण करायचं नाही. फक्त पद्धत शिकवायची आहे. ही पूजेची पद्धत नाही. जगण्याची पद्धत आहे. सगळ्या जगाला शिकवण देण्यासाठी आपला जन्म भारताला झाला आहे. आपण त्या पूर्वजांचे वशंज आहोत" असे भागवत म्हणाले.

loading image
go to top