
"2024 पर्यंत विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या 40 कोटींवर नेऊ”
गेल्या आठवड्यात सुमारे 382,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी यांनी दिली. कोरानाच्या ओमिक्रॉन लाटेनंतर हे क्षेत्र पुन्हा उसळी घेत असल्याचे संकेत त्यांनी दिले. शिंदे हे संसदेत बोलत होते.
शिंदे म्हणाले, ज्या वेळी आता जगभरात विमान वाहतूक संकटाचा सामना करत आहे, त्यावेळी जेट आणि आकासा हे दोन नवीन एअरलाइन्स लवकरच देशात त्यांची सेवा सुरू करणार आहेत. त्यांनी 2023-24 पर्यंत एकूण प्रवासी वाहतूक जवळपास तिप्पट करून 40 कोटींपर्यंत करण्याचे लक्ष्य ठेवले. (We set to target of total passenger traffic by 2022-2023 to 400 million, Jyotiraditya Scindia said )
हेही वाचा: काश्मिरी पंडितांसाठी ‘मॉडेल सिटी’चा प्रस्ताव!
"गेल्या सात दिवसांत आम्ही दररोज तब्बल 382,000 प्रवासी प्रवास करताना पाहिले. यावरुन हवाई क्षेत्र पुनरुज्जीवन होण्याची आशा आहे. यातच आम्ही 2023-24 हवाई पर्यंत प्रवाशांची संख्या 40 कोटींवर नेऊ” असे शिंदे म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विमान वाहतूक क्षेत्राने लक्ष देण्यास सुरुवात केली असून नोव्हेंबर 2021 मध्ये देशातील विमान प्रवाशांची संख्या 390,000 प्रतिदिन झाली, कोरोनापुर्व काळात ही संख्या प्रतिदिन 415,000 होती. मात्र सरकारने गेल्या दोन वर्षात हवाई क्षेत्रात संरचनात्मक बदल घडवून आणला आणि यावर आणखी भर देणे सुरु असल्याचे शिंदे म्हणाले.
हेही वाचा: जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; 2 जवानांसह 5 जण जखमी
महिला पायलट विषयी बोलताना शिंदे म्हणाले, “भारतात एकूण सैन्याच्या 15% पेक्षा जास्त महिला पायलट आहेत तर जगातील इतर सर्व देशांमध्ये केवळ 5% पायलट महिला आहेत.”
2014 पर्यंत देशात 74 विमानतळ होते तर गेल्या सात वर्षांत 66 नवीन विमानतळांची भर पडली, असेही शिंदे म्हणाले. "2025 पर्यंत विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेण्याचा आमचा संकल्प असल्याचे शिंदे म्हणाले.
Web Title: We Set To Target Of Total Passenger Traffic By 2022 2023 To 400 Million Jyotiraditya Scindia Said
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..